consultation

गुंजवणे

ग्रामपंचायत

Location

आमच्या विषयी

गुंजवणे गावाचा इतिहास

गुंजवणे हे गाव पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव आहे. हे गाव राजगड शहरापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गुंजवणे गावाचा इतिहास हा अति प्राचीन काळी सह्याद्री पर्वत दंडक आराण्याचा भाग म्हणून ओळखला जात असे. या दंडक आराण्यात अनेक वने होती. त्या वनात काष्ठी जाती उत्पन्न आहे त्याकारण त्या वनास ते वन म्हणून संबोधले जायचे. या वनामध्ये गुंजच्या वृक्षाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात आढळत असे. त्या गुंजचा वनालाच गुंजवन असे नाव पडले. त्या वनातून जी वाहणारी नदी होती तिला गुंजवणी असे संबोधण्यात आले. या नदीच्या मुदतवर्षी जे गाव वसले त्याला गुंजवणे असे नाव प्राप्त झाले. या गावाचा इतिहास हा अतिप्राचीन असून मातृसत्ता व्यवस्था होती. त्या काळातील स्वाभीष्ट मोठ्या प्रमाणात आढळतात. अनेक प्राचीन राज्यव्यवस्थांमध्ये या गावाला महत्वाचे स्थान होते. ८५ गाव गुंजण चौक्यातील हे महत्त्वाचे प्रमुख मौजे गुंजवणे म्हणून कार्यभार चालत असे. निजाम, आदिलशाही कालावधीतही हे मावळ शहाश्रीराजांच्या वतनामध्ये येत असून येथील देशमुख हेवजतराव शिर्केकर हे होते. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर स्वराज्याच्या बारा मावळ काषाऱ्यात गुंजवणे गावात होत असे. आजही महाराजांच्या काळातील ज्या ठिकाणांचा त्या त्या नावाने उल्लेखले जाते. पेशवे कालावधी व इंग्रज राज्यातही राजगड तालुक्याचा कारभार याच गावातून चालत असे. वास्तुस्मृते — सतीचामळ, पेंचाळ मळा, मारुती मंदिर, वेताळ, स्त्रीमशाबी, जननिदेवी, रहदारीदास, बाजारेपठ, घेऱ्याजगद, गुंजवणी नदी उगम, प्राचीन गुंजवण गावाचे घरांचे चौथरे, पाटीवमगिरि दगडात पुलील दगडात, राहित मळा, कोटमजाई, रामदर्याणी, धनगरवस्ती, झगडामाळ, चव्हाळा, कुरुंबणी, पाटकी, चांभारवाडा, गजलक्ष्मी मंदिर, गावठाण, वाघजाई, सरवना, बाजारवाट, महाडपेडा, ब्राह्मणवाडा, आनंदाश्रम, सुतारकी, महारकी, चांभारकुंड, जननिमंदिर, डिंबळेवळा समाज, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चंद्रदत्त मंदिर, शिवकालीन महादेव मंदिर, रामलवाडी, वांद्रेवाडी, जांभुळवाडी, चाफे मळा, लिंहवाडी.

गुंजवणे गाव गुंजवणे गाव

गुंजवणे गावाची लोकसंख्या सांख्यिकी माहिती

खालील तक्त्यामध्ये गुंजवणे गावातील एकूण लोकसंख्या, बालकांची संख्या, अनुसूचित जाती-जमातींची संख्या, तसेच साक्षर व निरक्षर व्यक्तींची माहिती दिलेली आहे. ही माहिती गावाच्या सामाजिक आणि शैक्षणिक रचनेचा अंदाज देण्यासाठी उपयुक्त आहे.

घटक एकूण पुरुष स्त्रिया
एकूण लोकसंख्या 703 359 344
बालक संख्या (0–6 वर्षे) 93 43 50
अनुसूचित जाती (SC) 9 5 4
अनुसूचित जमाती (ST) N/A N/A N/A
साक्षर व्यक्ती 432 255 177
निरक्षर व्यक्ती 271 104 167